Asked QuestionFrequently Asked Questions?

  • आचार्य गुरुकुलम मध्ये नर्सरी पासून १० वी पर्यंत शिक्षण दिले जाते . संस्काराला अगदी छोटे वय म्हणजेच २ ऱ्या वयापासून असेल तर खूप चांगले असते तसेच ते १६ वर्षापर्यंत कायम दिले जातात
    आम्ही कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि अतिरिक्त अभ्यास तास उपलब्ध करून देतो, जेणेकरून ते सहजपणे प्रगती करू शकतील.
    प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिकण्याची गती सुधारते.
    हो, आमच्या मालशिरस (Solapur) शाखेत होस्टेल सुविधा उपलब्ध आहेत, जिथे विद्यार्थ्यांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण पुरवले जाते.
    गुरुकुलम मध्ये मुलांना बालपण जगू दिले जाते , अभ्यासाबरोबरच मजा मस्ती , खूप मैदानी खेळ , तीन वेळा मेडिटेशन असते . मेडिटेशन ने मुलांना जागृत अवस्थेतील झोप मिळते त्यामुळे मुले कायम फ्रेश राहतात.
    अभ्यासक्रम जरी इंग्लिश असेल तरीही मुलांना मराठीतून शिकविले जाते --- सर्व विषय , कन्सेप्ट मराठीतून समजावून दिले जातात . कारण मातृभाषेत त्यांना जास्त समजले जाते त्यांना जरी इंग्लिश माध्यम असले व त्यांना मराठी भाषा विषय कमी असला तरी गुरुकुलम मध्ये मराठी खूप खोलवर व्याकरणासहित शिकवला जातो . एक भाषा एवढी जास्त चांगली करून घेतली जाते कि त्यामध्ये काहीही समजावून सांगितले तरी ते समजते
    गुरुकुलम मध्ये महाराष्ट्र बोर्ड ... इंग्लिश माध्यम चा अभ्यासक्रम घेतला जातो .
    गुरुकुलम मधील मुलगा हो भारतीय संस्कृतीच्या मूल्यांनी परिपूर्ण होतो , विद्यार्थी हा सुसंकृत असतो , त्याच्यामध्ये जिद्द, नम्रता, चिकाटी ,आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा, संयम हे भाव गुरुकुलम मध्ये भरले जातात . विद्यार्थी स्वतःचे मत तयार करून तो परखड पणे मांडण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीचे सर्व काम गुरुकुल करते
    मुलांना वाचन-लेखन शिकवले जाते. small introduction, English मधील teaching chart दाखवले जातात. जसा वर्ग पुढे जातो त्यासोबत व्याकरण देखील शिकवले जाते. 6th std पासून spoken English हा teaching साठी practical subject म्हणून add केला जातो.
    प्रामुख्याने कारण मुलांनी एक भाषा आधी perfect करून घेतली जाते. त्यानंतर नवीन भाषा व मराठी यांच्यामधील मुलभूत फरक काय आहे हे त्यांना समजावले जाते. मुलांना simple वाक्य त्याच्याशी बोलण्याची सवय करून घेतली जाते. सतत सराव केल्यामुळे मुलांना इंग्रजी शिकवले जाते.
    प्रायमरी लेव्हलपासून प्रत्येक विषय स्टेप बाय स्टेप समजावून सांगितला जातो. सुरुवातीला थिअरेटिकल माहिती दिली जाते आणि त्यानंतर कॉम्प्युटर प्रॅक्टिकल करून घेतले जातात. ड्रॉइंग, कम्प्लिशन हेल्प, चार्ट्स आणि अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून मुलांची इंटरेस्ट वाढवली जाते. त्यामुळे अभ्यास कंटाळवाणा वाटत नाही.
    या वयोगटातील मुलांवर परीक्षेचा प्रेशर न देता त्यांचा बेस मजबूत करण्यावर भर दिला जातो. शालेय अभ्यासासोबत वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज, जनरल नॉलेज, लॉजिकल थिंकिंग आणि ऑब्झर्वेशन स्किल्स विकसित केल्या जातात. त्यामुळे पुढे स्कॉलरशिपसाठी मुलं मेंटली आणि अकॅडमिकली तयार होतात.
    ड्रॉइंग टीचर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना चित्रकला, रेखाटन याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला जातो आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. कमी ग्रेड मिळाल्यामुळे कला शिकणे हे गुरुकुलमध्ये थांबवले जात नाही. सराव, एक्सप्रेशन आणि क्रिएटिव्हिटी यावर भर दिला जातो, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.
    होय, मैदानात सगळ्या मुलांचे खेळ होतात. मुलांना टीमवाईज वेगवेगळे खेळ खेळायला दिले जातात. टीम्स टर्नवाईज खेळतात आणि प्रत्येक मुलाला खेळात सहभागी होण्याची संधी दिली जाते. स्वतःची टर्न येईपर्यंत मुले इतर टीमची परफॉर्मन्स पाहतात, नियम समजून घेतात आणि इतरांना चिअर करतात. त्यामुळे मुलांमध्ये सहकार्याची भावना, संयम, खेळाडूवृत्ती आणि टीमवर्क विकसित होते.
    प्रत्येक मुलगा वेगळा असतो. गुरुकुलमध्ये आपल्याला रॅट रेसचा भाग न होता वेगळ्या विचारसरणी कशी विकसित करावी याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. मुलांच्या आवडी शोधून त्यावर काम केले जाते. त्यामुळे मागे पडण्यापेक्षा मुलांची स्वतःची वेगळी ओळख तयार होते.
    मुलांना अभ्यासाच्या रेग्युलर फ्लोमध्ये आणण्यासाठी त्यांच्या बेसिक पातळीपासून म्हणजे अगदी प्री-प्रायमरीपासून सुरुवात केली जाते. प्रत्येक मुलाला ठरावीक वेळ दिला जातो आणि त्या वेळेत सिलेक्टेड सिलेबस शिकवला जातो. सिलेबस पूर्ण झाल्यानंतर मुलांची परीक्षा घेतली जाते आणि त्यानुसार पुढील सिलेबस घेतला जातो. साधारणपणे एका वर्षामध्ये सहावीपर्यंतचे इंग्लिश, मराठी आणि गणित हे विषय शिकवले जातात. मराठी व इंग्लिश व्याकरण शिकवल्यामुळे इतर विषय देखील मुलांना सहज समजायला मदत होते. वाचन, लेखन आणि अर्थ समजून घेणे याबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते आणि अशा प्रकारे मुलांना हळूहळू पुढच्या स्तरावर नेले जाते.
    तू कसा वेगळा आहेस, तुझ्यातील गुण कसे वेगळे आहेत” हे मुलांना समजावले जाते. १२ तास गुरुकुलम् मध्ये राहणे हे फक्त अभ्यास नाही, तर त्यांच्या आत्मविश्वास, संस्कार, शिस्त, जीवनकौशल्य आणि सर्जनशीलतेसाठी एक मोठी गुंतवणूक आहे. ही वेळ त्यांना स्वतंत्र विचार करायला, आपली क्षमता ओळखायला आणि आयुष्यातील योग्य दिशा निवडायला शिकवते. त्यामुळे गुरुकुलम् मधील प्रत्येक तास त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभूत ठरतो.
    मुलांना रस्ते झाडायला लावणे हा केवळ स्वच्छतेचा सराव नसून त्यांच्यातील अहंकार कमी करण्याचा एक महत्त्वाचा संस्कार आहे. अनेक मुले घरातील श्रीमंती आणि सोयी-सुविधांचे वलय घेऊन गुरुकुलमध्ये येतात; त्यांच्या मनातील हा 'मीपणा' दूर करून त्यांना नम्र बनवण्यासाठी श्रमाची ही सवय लावली जाते. या कृतीतून त्यांचा 'Somebodyness to Nobodyness' (अहंकाराकडून नम्रतेकडे) असा प्रवास होतो, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने ज्ञान ग्रहण करण्यास पात्र ठरतात.
    गुरुकुलमध्ये शिकल्यामुळे मुलाचे नुकसान होत नाही, उलट तो स्पर्धेच्या जगात अधिक सक्षमपणे टिकतो. आधुनिक गुरुकुलमध्ये पारंपरिक संस्कार आणि राज्य शिक्षण मंडळाचा (State Board) आधुनिक अभ्यासक्रम यांचा सुवर्णमध्य साधला जातो. येथे केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांमध्ये जिद्द, नम्रता, चिकाटी, आत्मविश्वास आणि संयम यांसारखे महत्त्वाचे जीवनकौशल्य विकसित केले जातात. त्यामुळे, उद्धटपणा किंवा ऐकण्याची वृत्ती नसलेली मुले देखील गुरुकुलच्या संस्कारांमुळे जबाबदार आणि सुसंस्कृत बनतात, जे त्यांना आयुष्यातील कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मदत करते.
whatsapp--v1